खूप गोष्टी ऐकणं, अनुभवणं आणि लक्षात राहणं महत्त्वाचं. हे सगळं ‘अन् पारिजातक हसला’मध्ये खूप चांगलं प्रतिबिंबित झालं आहे
शिकताना आणि शिकवताना मला एक गोष्ट नेहमी जाणवत गेली. ती म्हणजे मॉडेल कुठलंही असो, त्याचं एकदा रुटीन झालं की, त्यातला रस संपतो. ठरवलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे, आधीच आखलेल्या योजनेप्रमाणे सगळं शिक्षण चालत असेल तर समजावं की, नक्कीच काहीतरी चुकतंय. नवीन विषय शिकणं, हे नवीन रानवाटा धुंडाळणं, नवीन शिखर चढून जाणं, नवीन खजिन्याचा शोध, एखाद्या रहस्यकथेची उकल करण्यासारखं, एखादी साहसकथा स्वतः अनुभवण्यासारखं वाटलं पाहिजे.......